ETV Bharat / state

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर, 3 गंभीर - धुळे अपघात बातमी

कंटेनरचा टायर फुटल्याने तो बदलण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी भरधाव वेगाने असलेल्या दुधाच्या टॅंकरने उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर, तिघे गंभीर जखमी झाले आहे.

ट्रक-कंटेनर अपघात
ट्रक-कंटेनर अपघात
author img

By

Published : Oct 22, 2020, 3:09 PM IST

धुळे - शहराजवळील नगावबारी परिसरामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर दुधाच्या टँकरने रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर, तिघे गंभीर जखमी झाले आहे. यावेळी उभ्या कंटेनरने पेट घेतला.

कंटेनरचा टायर फुटल्याने तो बदलण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी भरधाव वेगाने असलेल्या दुधाच्या टॅंकरने उभ्या कंटेनरला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, त्यामध्ये दुधाचा टॅंकर आणि कंटेनरने त्वरित पेट घेतला. या दुर्घटनेमध्ये टायर बदलण्यासाठी उतरलेल्या व्यक्तीचा चिरडून जागीच मृत्यू झाला. तर तीन जण आगीत भाजल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.