धुळे : शिरपूर-चोपडा रस्त्यावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.
शिरपूर येथून चोपडाकडे जाणारा कापसाने भरलेला ट्रक समोरून येणाऱ्या आणखी एका ट्रकला धडकला. तरडी गावाजवळ झालेल्या या अपघातात चालक राहुल रोहिदास रणदिवे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघांची परिस्थिती गंभीर आहे.
आयशर (ट्रक) व ट्रकच्या धडकेत आयशर चालक राहुल रणदिवे हे समोरील भागात अडकले. त्यांना काढण्यासाठी महेंद्र पाटील, अमोल पाटील, सागर पाटील,विजय पाटील, व अन्य उपस्थित तरुणांनी प्रयत्न केले.