ETV Bharat / state

गावठी कट्ट्यासह व्हिडिओ बनवणाऱ्या तिघांवर धुळे पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Jul 9, 2020, 4:40 PM IST

गावठी कट्ट्यासह टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्याला धुळे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. याप्रकरणी कट्ट्यासह टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्याला तसे त्याच्या अन्य दोन साथीदारांना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडूनही एक गावठी कट्टा जप्त केला आहे. यात तीन जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जप्त केला गावठी कट्टा

धुळे - धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गावठी कट्ट्यासह टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्याला तसे त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. आत्तापर्यंत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गेल्या महिन्याभरात नऊ गावठी कट्टे जप्त केले असून हे धुळे शहरात कुठून येतात याचा तपास पोलीस करीत आहेत.

धुळे शहरासह जिल्ह्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. अवैध धंद्यांविरुद्ध तसेच अवैध शस्त्र बाळगण्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून गावठी कट्ट्यासह टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्याला धुळे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. धुळे शहरातील दीपक शिरसाट याने टिकटॉकवर गावठी कट्ट्यासोबत एक व्हिडिओ तयार केला होता. तो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या अन्य 2 साथीदार अभय अमृतसागर आणि पंकज जिसेजा यांचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडूनही एक गावठी कट्टा जप्त केला आहे. यात तीन जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. या तिन्ही आरोपींनी गावठी पिस्तूल कुठून आणल्यात आणि या माध्यमातून काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात नऊ गावठी कट्टे जप्त करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. मात्र आता त्याच्या मुळ सुत्रधारांपर्यंत पोहोचण्याची गरज निर्माण झाली आहे. मध्य प्रदेश राज्याच्या काही भागातून हे गावठी कट्टे महाराष्ट्रात आणि धुळे जिल्ह्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत मध्य प्रदेश पोलिसांच्यादेखील आम्ही संपर्कात असून याचा सखोल तपास सुरू आहे, जिल्ह्यात कायद्याचं राज्य असून अवैध धंदे किंवा चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी यावेळी दिला.

मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने धुळे जिल्ह्यात येणारी अवैध शस्त्र रोखण्याचं आव्हान धुळे जिल्हा पोलिसांच्या समोर आहे. मात्र, मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी केली जाते की नाही याचादेखील तपास पोलीस प्रशासनाने करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच अवैध शस्त्रांचे मूळ धुळे शहरात आणि जिल्ह्यातदेखील असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.