ETV Bharat / state

सातपुड्याच्या वन जमिनीवर गांजा लागवडीची झिंग, मागील वर्षात तब्बल 35 गुन्हे दाखल - धुळे गांजा बातमी

धुळे जिल्ह्यात तर 2020 या वर्षात 35 अमली पदार्थांच्या कारवाया झाल्या आहेत. त्यात 3 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामुळे सातपुड्यातील वन जमिनींवर गांजाची शेती केली जात असल्याचे समोर येत आहे.

photo
छायाचित्र
author img

By

Published : Mar 10, 2021, 3:37 PM IST

धुळे - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सातपुड्याच्या वन जमिनीवर अफूची शेती होत असल्याचे मागे आढळले होते. अनेक वेळेला पोलिसांनी कारवाई केली असलेली असली तरी पूर्णपणे या प्रकाराला थांबवू शकलेली नाहीत. मात्र, या कारवाईनंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला अमली पदार्थांच्या लागवडीचे ग्रहण लागल्याची चर्चा पुन्हा समोर आली. धुळे जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगा गांजाच्या शेतीने बदनाम झालेला आहे. बऱ्याच वेळा हे अमली पदार्थ मुंबईत नेले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अमली पदार्थांचे मुंबई कनेक्शन तर नाही ना याचा शोध लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

नेहमिच्या पिकांमध्ये अंतर पिकात ही अफू गांजाची शेती केली जात असल्याने पोलिसांच्या नजरेत ही शेती पडत नाही. मात्र, हे अमली पदार्थ मुंबई, सुरत व पुणे अशा महानगरांमध्ये तर विक्रीसाठी नेले जात नाहीत ना याचा शोध लावणे गरजेचे आहे. धुळे जिल्ह्यात तर 2020 या वर्षात 35 अमली पदार्थांच्या कारवाया झाल्या आहेत. त्यात 3 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सातपुड्यातील वन जमिनींवर गांजाची शेती केली जात असल्याचे प्रामुख्याने समोर आले आहे. त्यामुळे मूळ मालक सापडत नाहीत. कृषी, वन, महसूल व पोलीस अशा चार विभागांना एकत्र मिळवून हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सातपुड्यात गांजा व अफू लागवडीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच हे अमली पदार्थ मुंबईकडे नेली जात असल्याचे कारवाई देखील करण्यात आल्या आहेत. पोलीस याबाबत उघडपणे बोलत नसले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड होणार गांजा,अफू कुठे विकला जातो याचे उत्तर मात्र यंत्रणेकडे नाही.

धुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षातील अमली पदार्थांच्या कारवाई

वर्षदाखल गुन्हेअटक संशयित
201511
201622
2017713
2018911
20191421
20203554

सातपुड्यात कमी कष्टात अमली पदार्थांच्या लागवडीतून बक्कळ पैसे कमविण्याची झिंग अनेक शेतकऱ्यांना लागली आहे. ही झिंग पोलीस उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस प्रशासनाकडून गांजा शेती प्रमाण कमी व्हावे यासाठी जनजागृतीचे प्रयत्न देखील केले जात असल्याच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी सांगितले.

हेही वाचा - धुळ्यात गोडाऊनला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

हेही वाचा - इंधन दरवाढ : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने चूल आणि गौऱ्याची विक्री करत अनोखे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.