ETV Bharat / state

धुळ्यात बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या; लाखो रुपयांची उलाढाल

भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्वाचा असणारा पोळा सण शुक्रवारी साजरा होणार आहे. पोळ्यानिमित्त बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू  शहरातील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

पोळ्यानिमित्त बाजारपेठ सजली
author img

By

Published : Aug 29, 2019, 5:19 PM IST

धुळे- बैलपोळा सणानिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या असून बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यंदा जिल्ह्यात पाऊस उत्तम झाला असल्याने पोळा सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामुळे बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच घरात पूजेसाठी लागणारे मातीचे बैलदेखील विक्रीसाठी बाजारात आले आहेत. मातीच्या बैलांपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल

भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाचा असणारा पोळा सण शुक्रवारी साजरा होणार आहे. पोळ्यानिमित्त बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू शहरातील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यात रंग, झूल, घुंगरू, यांचा समावेश आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी झाली आहे. आपल्या सर्जा-राजाला सुंदररित्या सजविण्यासाठी प्रत्येक शेतकरी आतूर झालेला असतो. बैलांच्या शिंगांना रंगविण्यासाठी लागणारे रासायनिक आणि नैसर्गिक रंगदेखील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रंगांच्या किमतीत यंदा १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यामुळे व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Intro:पोळा सणानिमित्त धुळे शहरातील बाजारपेठ सजली असून बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यंदा जिल्ह्यात पाऊस उत्तम झाला असून पोळा सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामुळे बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच घरात पूजेसाठी लागणारे मातीचे बैल देखील विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. मातीच्या बैलांपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. Body:भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्वाचा असणारा पोळा सण शुक्रवारी साजरा होणार आहे. पोळ्यानिमित्त बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू धुळे शहरातील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत, यात रंग, झूल, घुंगरू, यांचा समावेश आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी झाली असून आपल्या सर्जाराजाला सुंदररित्या सजविण्यासाठी प्रत्येक शेतकरी आतुर झालेला असतो. बैलांच्या शिंगाना रंगविण्यासाठी लागणारे रासायनिक आणि नैसर्गिक रंग देखील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यंदा धुळे जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरीराजा समाधानी झाला आहे. यामुळे यंदाचा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासोबत घरात पूजेसाठी लागणारे मातीचे बैल देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मात्र काळानुरूप मातीच्या बैलांपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बैलांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. रंगांच्या किमती यंदा वाढल्याने १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी पाहायला मिळत असून यानिमित्ताने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यामुळे व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.