धुळे - कर्नाटककडून गुजरातकडे कापसाने भरलेला ट्रकला वीजेची तार स्पर्श झाल्याने आग लागली. तसेच या तारेमुळे वीजेचा धक्का लागल्याने ट्रकमधील क्लीनरचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ट्रकमधील कापूस पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
धुळे शहराजवळील धुळे-सुरत बायपासवर कापसाच्या ट्रकला वीजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने आग लागून कापूस जळाला. वीजेच्या धक्क्याने ट्रकमधील क्लीनरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कापसाने भरलेला मालट्रक कर्नाटकमधून गुजरातकडे जात होता. रस्त्याच्या कडेला तेथे जवळच असलेल्या वीज कंपनीच्या हाय टेन्शन तारेला स्पर्श झाल्याने कापसाला मोठी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
हेही वाचा - धुळ्यात कापूस व्यापाऱ्याचे २ लाख ६६ हजार रुपये घेऊन चोरटे पसार