धुळे- समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे ट्विट धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. मात्र, यात त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ऐवजी लोकमान्य टिळकांचा फोटो वापरल्याने सोशल मीडियावर सुभाष भामरे ट्रोल झाले आहेत.
![subhash bhamare tweet tilak photo](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhdhulesubhashbhamretroll7204249_10052020090901_1005f_1589081941_690.jpg)
समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले यांची जयंती 9 मे रोजी साजरी केली जाते, गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सुभाष भामरे यांनी ट्विटरद्वारे अभिवादन केले. मात्र, यात त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ऐवजी लोकमान्य टिळकांचा फोटो वापरल्याने सुभाष भामरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.
सुभाष भामरे यांच ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.त्यांनी ते नंतर डिलीट केले आहे.