धुळे - अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य संमेलनातून त्यांचे विचार रुजवण्याचे काम गोविंद पानसरेंनी केले. आज महापुरुषांच्या विचारांची देशाला गरज आहे. मात्र, महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे मत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी यांनी व्यक्त केले.
शहरातील शाहू महाराज नाट्य मंदिरात २ दिवशीय कॉम्रेड अण्णाभाऊ साठे १० व्या साहित्य संमलेनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमलेनाच्या निमित्ताने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे धुळ्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार मर्यादित करण्यात आले होते. मात्र, या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणे सोपे झाले आहे. आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत महापुरुषांचे विचार वेगाने पसरत आहेत. मात्र, महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसवण्याचे षडयंत्र सुरू आहे. महापुरुषांच्या मूर्तीचे पूजन आणि विचारांचे दफन करण्यासाठी चाललेले षडयंत्र थांबवायला हवे, असे स्मिता पानसरे म्हणाल्या.