धुळे - प्रचंड गैरसोय असलेल्या कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्रांवर सोयीसुविधा पुरवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेने आयुक्त आणि जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक महेश भडांगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सोयीसुविधांचा वाणवा आहे. गर्दी न होता प्रत्येकला लस कशी देता येईल याचे नियोजन करावे, नोंदणी असेल त्यांनीच लसीकरण केंद्रावर यावे याची व्यवस्था करण्यासाठी पायलेट प्रोजेक्ट राबवावा अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - ईटीव्ही विशेष : तरुण-तरुणींनो, अफवा अन् गैरसमजांना बळी न पडता लस घ्या; तज्ज्ञांचा सल्ला