ETV Bharat / state

धुळे: शिरपूर तालुका पोलिसांकडून 72 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त - मध्यप्रदेशातून आलेला मद्यसाठा

शिरपूर तालुका हद्दीतील सीमेलगतच्या मालकातर या गावातील लुला कांजऱ्या पावरा याच घरामागील भागात धडक कारवाई करत पोलीस पथकाने 34 हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्य साठ्याच्या 240 बाटल्या आणि 38 हजार रुपये किमतीची देशी दारू असलेल्या 720 बाटल्या असा एकूण 72 हजार रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त केला आहे.

शिरपूर पोलीस ठाणे
author img

By

Published : Oct 2, 2019, 6:00 PM IST

धुळे- जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगत मालकातर गाव आहे. या गावातील एका घरामागून तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने 72 हजार रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.

प्रतिक्रिया देताना शिरपूर पाेलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात अवैध मद्यसाठा रोखण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मध्यप्रदेशातील पानसेमल परिसरातून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्ये पाठविला जात असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिरपूर तालुका हद्दीतील सीमेलगतच्या मालकातर या गावातील लुला कांजऱ्या पावरा याच्या घरावर छापा टाकला. या ठिकाणी धडक कारवाई करत 34 हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्य साठ्याच्या 240 बाटल्या आणि 38 हजार रुपये किमतीची देशी दारू असलेल्या 720 बाटल्या असा एकूण 72 हजार रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या मद्यसाठा बाळगणाऱ्यांच्या तंबूत घबराट पसरली आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या मालकातर या गावातील एका घरामागून तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने 72 हजार रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.

Body:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात अवैध मद्यसाठा रोखण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील पानसेमल परिसरातून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारुचा साठा महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्ये पाठविला जात असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिरपूर तालुका हद्दीतील सीमेलगतच्या मालकातर या गावातील लुला कांजऱ्या पावरा याच घरामागील भागात मध्यप्रदेशातून आलेला दारूसाठा ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली होती , त्यानुसार पथकाने या ठिकाणी धडक कारवाई करत 34 हजार रुपये किमतीच्या इंपिरियल ब्लू विदेशी मद्य साठ्याच्या 240 बाटल्या आणि 38 हजार रुपये किमतीचा टॅंगो पंच नावाची देशी दारू असलेल्या 720 बाटल्या असे एकूण 72 हजार रुपये किमतीचा देशी-विदेशी दारुचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या मद्यसाठा बाळगणार यांच्या तंबूत घबराट पसरली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.