ETV Bharat / state

धुळे : शाळेतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर नाल्यात अत्याचार, नराधमास अटक - accused

जिल्ह्यातील लोणखेडी शिवारातील एका अल्पवयीन मुलीवर रमेश पवार या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी तपास करून आरोपीस अटक केली आहे.

नराधमास पोलिसांनी अटक केली
author img

By

Published : Jul 30, 2019, 1:31 PM IST

धुळे - जिल्ह्यातील लोणखेडी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

धुळ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, फरार नराधमाला अटक

जिल्ह्यातील लोणखेडी शिवारातील एका अल्पवयीन मुलीवर रमेश पवार या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीडित मुलगी लोणखेडी शिवारातील शेतात राहते. ती शाळा संपल्यानंतर गावातून शेतातील घराकडे जात होती. त्यावेळी रमेशने तिला दुचाकीवरून घरी सोडतो असे सांगून, लोणखेडी जवळील उमरा नाल्यात नेले. तेथे तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी रमेशने तेथून पळ काढला.

पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तातडीने पोलीस ठाणे गाठल्यावर नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपी रमेश याला अटक केली.

या घटनेमुळे लोणखेडी गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या घटनेचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस ठाणे करीत आहे.

Intro: धुळे जिल्ह्यातील लोणखेडी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमला पोलिसांनी अटक केली आहे.
Body: धुळे जिल्ह्यातील लोणखेडी शिवारातील एका अल्पवयीन मुलीवर रमेश पवार या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी लोणखेडी शिवारातील शेतात राहते. ती शाळा संपल्यानंतर गावातून शेतातील घराकडे जात होती. त्यावेळी रमेशने तिला दुचाकीवरून घरी सोडतो असे सांगून, लोणखेडी जवळील उमरा नाल्यात नेले. तेथे तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार करून आरोपी रमेश तेथून फरार झाला. हा घडलेला प्रकार पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर तिच्या आई वडिलांनी तातडीने पोलिस ठाणे गाठले. रमेश विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपी रमेश याला अटक केली. या घटनेमुळे लोणखेडी गावात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.