ETV Bharat / state

धुळ्यात ट्रॅक आणि स्कॉर्पिओमध्ये भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - accident in dhule two died

धुळे शहरालगत असलेल्या बाळापूर फागणे गावाजवळ ट्रॅक आणि स्कॉर्पिओ यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Scorpio van and truck accident in dhule two died
धुळ्यात ट्रॅक आणि स्कॉर्पिओमध्ये भीषण अपघात
author img

By

Published : Jun 13, 2020, 3:22 PM IST

धुळे - शहरालगत असलेल्या बाळापूर फागणे गावाजवळ ट्रॅक आणि स्कॉर्पिओ यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरत-नागपूर महामार्गावर हा इपघात झाला असून महामार्गावर असलेला पूर अत्यंत जुना व कमकुवत झाल्याने अपघाताचे केंद्र बनला आहे.

धुळ्यात ट्रॅक आणि स्कॉर्पिओमध्ये भीषण अपघात

जळगावहून धुळ्याकडे येणारी स्कॉर्पिओ आणि जळगावकडे जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यामुळे ही दोन्ही वाहने पुलावरून 50 फूट खाली कोसळली. यात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. स्कॉर्पिओमधील 2 जण जागीच ठार झाले.

हेही वाचा... 'निसर्गा'ने केलं बेघर आता वन विभागाचीही आडकाठी; २५ आदिवासी कुटुंब उघड्यावर...

अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढला. मात्र, स्कॉर्पिओ पूर्णत: चुराडा झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.