धुळे - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता धुळ्यात कोरोनासह आता सारीचा प्रादूर्भावही वाढत आहे. यामुळे धुळेकरांच्या चिंता वाढली आहे.
एकीकडे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने बाधितांचा आकडा 2 हजार 765 वर पोहोचला आहे. मात्र, आता सारीचे रुग्ण धुळ्यात आढळत असल्याने धुळेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जवळ-जवळ आतापर्यंत सारीच्या तीनशे रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यापैकी 30 रुग्णांनी उपचार घेताना आपला जीव गमावला आहे. तर सध्या 21 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बहुतांश नागरिक रस्त्यावर फिरताना चेहऱ्याला मास्क देखील लावत नाहीत. तर दुसरीकडे शहरात नागरिक गर्दी करून सोशल डिस्टंसिंगचा पूर्णतः फज्जा उडविताना पहायला मिळत आहे. यामुळे कोरोना व सारी या दोन्ही आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - धुळे: 'जनता कर्फ्यू'ला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद, व्यवसायिकांकडून कडकडीत बंद