धुळे - धुळे शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने रविवार 14 मार्च सायंकाळी 6 वाजेपासून 17 मार्च बुधवार सकाळी 6 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद राहणार आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज(सोमवारी) पालकमंत्री अब्दुल सत्तार धुळे दौऱ्यावर येणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
'यांना' असेल जनता कर्फ्यूमध्ये सूट -
धुळे शहरात कोरोना रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. जनता कर्फ्यूमध्ये सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दूध व्यवसाय, मेडिकल आणि अत्यावश्यक व्यवसायांना सूट देण्यात आली आहे.
आग्रा रोडवर शुकशुकाट -
शहरातील काही मुख्य बाजार पेठेत कायम गर्दी असते तेथे आज शुकशुकाट बघायला मिळाला. आग्रा रोडवरील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने 6 वाजता बंद करून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. सहा वाजल्यानंतर शहरातील कायम वर्दळीचा असणाऱ्या याच रोडला पोलीस छावणीचे रूप आले होते.