ETV Bharat / state

धुळ्यात पोलिसांनी जप्त केला 6 लाख रुपये किमतीचा सुका गांजा

लाकडे हनुमान या गावात एका शेतात सुका गांजा असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

धुळ्यात पोलिसांनी जप्त केला 6 लाख रुपये किमतीचा सुका गांजा
author img

By

Published : Nov 9, 2019, 5:27 PM IST

धुळे - शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान या गावात गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यात सुमारे 6 लाख 35 हजार 500 रुपये किमतीचा मेंदूवर परिणाम करणारा सुका गांजा जप्त केला आहे.

धुळ्यात पोलिसांनी जप्त केला 6 लाख रुपये किमतीचा सुका गांजा

हेही वाचा- हार-जीतचा प्रश्न नाही, या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिमांमधील तणाव कमी होईल - इक्बाल अन्सारी

लाकडे हनुमान या गावात एका शेतात सुका गांजा असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी शेतात एका कपड्यावर सुका गांजा पडलेल्या स्थितीत आढळून आला. तसेच समोरच असलेल्या जागेवर कापूस आणि तुरीच्या शेतामध्ये झाडांच्या आडोशाला गांजाची झाडे दिसली. ही शेती बिला रवींद्र पाडवी यांची असल्याची माहिती मिळाली आहे.

या कारवाईची माहिती मिळताच शेतमालक हा फरार झाला आहे. पथकाने 1 हजार 16 किलो वजनाचा 5 लाख 82 हजार 500 रुपये किमतीचा आणि ओला गांजा 53 हजार रुपये किमतीचा, असा एकूण 6 लाख 35 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती केली जात आहे. या ठिकाणी वारंवार कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही सर्रासपणे अनेक शेत मालकांकडून गांजाची शेती केली जात आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान या गावातून शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 6 लाख 35 हजार 500 रुपये किमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा सुका गांजा जप्त केला आहे.

Body:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकडे हनुमान या गावात एका शेतात सुका गांजा असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती, या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता शेतात एका सभेत कपड्यावर सुका गांजा पडलेल्या स्थितीत आढळून आला तसेच समोरच असलेल्या जागेवर कापूस आणि तुरीच्या शेतामध्ये झाडांच्या आडोशाला गांजाचे झाड लावलेले दिसून आले सदरचे शेत हे बिला रवींद्र पाडवी यांचे असल्याचे समजले आहे या कारवाईची माहिती मिळताच शेतमालक हा फरार झाला असून या ठिकाणाहून पथकाने 1 हजार 16 किलो वजनाचा 5 लाख 82 हजार 500 रुपये किमतीचा आणि ओला गांजा 53 हजार रुपये किमतीचा असा एकूण 6 लाख 35 हजार 500 रुपये किमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा गांजा जप्त केला आहे. शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती केली जात असून या ठिकाणी वारंवार कारवाई केली जात आहे. मात्र तरीही सर्रासपणे अनेक शेत मालकांकडून गांजाची शेती केली जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.