ETV Bharat / state

Fake vaccination certificates :लसीकरणात बनावट प्रमाणपत्र वाटल्या प्रकरणी चौघांना पोलिसांनी केली अटक - आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे समावेश

बनावट लसीकरण प्रमाणपत्र (Fake vaccination certificate) घोटाळ्या प्रकरणी धुळे मनपाच्या आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Fake vaccination certificate
बनावट लसीकरण प्रमाणपत्र
author img

By

Published : Jan 16, 2022, 2:17 PM IST

धुळे : देशात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लसीकरणाबाबत जागृती करत लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मात्र आता लसीकरणाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्या (Dhule Fake vaccination certificate scam) प्रकरणी धुळे मनपाच्या आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी (Four arrested fake vaccination certificate scam) अटक केली आहे. संपूर्ण राज्यात खळबळ माजवणारा बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणी धुळे मनपाच्या आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी कर्मचाऱ्याला काल रात्री उशिरा धुळे शहर पोलिसांनकडून (Dhule city police action) अटक करण्यात आली आहे.

लसीकरणात बनावट प्रमाणपत्र वाटल्या प्रकरणी माहिती देताना पोलीस आणि शिवसेना नेते

याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मनपाचे सहायक आयुक्त नारायण सोनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Complaint of Narayan Sonar) करण्यात आला होता. तसेच शिवसेनेने या संदर्भामध्ये अनेकवेळा आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर आज धुळे शहर पोलीसंच्या पथकाने ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यात विशेष म्हणजे धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे (Health Officer Dr. Mahesh More involved) यांचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. या सोबतच या प्रकरणात कोण कोणत्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे, याची देखील चौकशी करण्याची मागणी आता शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. येणाऱ्या काही दिवसात या प्रकरणी काय कारवाई होते आणि अजून कोणा कोणाचा समावेश ह्या प्रकरणामध्ये आहे. हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा : Dhule Year Ender 2021 : आर्यन खान प्रकरण ते एसटी कर्मचारी आंदोलन; 'या' घटनांमुळे धुळे जिल्हा राहिला चर्चेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.