धुळे - २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील नगाव आणि चिंचगाव येथे सट्टा पेढी (झुगार अड्डा) सुरू करून मदत करण्यासाठी ही लाच मागितली होती. छोटु बोरसे, असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हे ही वाचा - भाजप आमदार संगीता ठोंबरेंसह पती विजयप्रकाश यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश
धुळे तालुक्यातील नगाव आणि चिंचगाव याठिकाणी सट्टा पेढी (झुगार अड्डा) सुरू करून मदत करण्यासाठी धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी छोटू बोरसे यांनी तक्रार दाराकडून तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दखल घेत ही कारवाई केली. तडजोड करुन २० हजार रूपये देण्याचे ठरले. लाचेचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये घेताना छोटू बोरसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून लाच मागणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
हे ही वाचा -बुलडाणामध्ये बनावट एटीएमद्वारे लुबाडणारी टोळी गजाआड