धुळे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण संपूर्ण खानदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अक्षय्य तृतीयेला खानदेशात घागर भरण्याची पद्धत असून हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्त बाजारात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असतानाही नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सोशल डिस्टंस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अक्षय तृतीया असल्याने नागरिकांनी बाजारात वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टंसचा फज्जा उडवल्याचे चित्र पाहायला मिळाले.