धुळे - येथील महानगरपालिका आवारातील पाण्याच्या पाईप लाईनला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे शहरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसताना दुसरीकडे पाण्याचा होणारा अपव्यय पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
धुळे महानगरपालिका आवारात असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनला गेल्या काही दिवसांपासून गळती लागली आहे. या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देऊनही शहरात काही भागात ५ ते ६ दिवसांआड तर काही भागात ८ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आह.
हेही वाचा - 'ग्रामीण भागात विकास करण्यासाठी सदैव प्रयत्नशील'
मात्र, दुसरीकडे महानगरपालिका आवारातच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ही पाण्याची गळती मनपा प्रशासनाने तत्काळ थांबवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा - अब्दुल सत्तारांच फडणवीसांना शिवभोजन थाळीचं आमंत्रण; सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यासोबत घेतला आस्वाद