धुळे - दादरवरून धुळे मार्गे उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या ट्रकचा सोनगीर शिवारात अपघात झाला होता. ट्रकमधील मजुरांची कोरोना चाचणी केली असता एक २२ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आढळून आला. मात्र, हा तरुण धुळ्यातील नसून दादरचा आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मजुरांनी आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. दादरहून धुळे मार्गे उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला होता. यामध्ये २० पेक्षा जास्त मजूर होते. अपघातानंतर त्यांना हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या मजुरांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी २२ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचे मूळ गाव आणि नावाची खातरजमा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तो तरुण धुळ्याचा नसून त्याच्या केस पेपरवर दादर-मुंबई असे लिहिले होते.