ETV Bharat / state

धुळ्यात गावठी पिस्तुलसह जिवंत काडतुसे जप्त; एकजण ताब्यात

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोलनाका येथे दुचाकीवर गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या एकाला पोलिसांनी शिताफीने पकडले. दीपक कौतिक पोळ (वय-२०) या संशियाला ताब्यात घेतले आहे. तो नाशिकच्या चांदवड तालुक्यातील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

dhule crime
धुळ्यात गावठी पिस्तुलसह जिवंत काडतुसे जप्त; एकजण ताब्यात
author img

By

Published : Jun 23, 2020, 3:13 PM IST

धुळे - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोलनाका येथे दुचाकीवर गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या एकाला पोलिसांनी शिताफीने पकडले. दीपक कौतिक पोळ (वय-२०) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. तो नाशिकच्या चांदवड तालुक्यातील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना संबंधित व्यक्तीची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. यावेळी हाडाखेडकडून धुळेकडे जाणारा एक व्यक्ती गावठी पिस्तुल बाळगत असल्याची टीप मिळाली. पोलिसांनी टोल नाक्याजवळ त्याची दुचाकी आडवली. यावेळी झडती घेतल्यानंतर त्याचाकडे ३० हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे सापडली. या मुद्देमालाची किंमत ३५ हजार रुपये आहे.

संबंधित कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण मोरे, महेंद्र सपकाळ, हेमंत पाटील आदींनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.