धुळे - धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलीला न्याय मिळावा यासाठी उषोषण ( Dhule Collector Office hunger strike ) करत होते. उपोषणाला बसलेल्या वृद्ध आजोबांचे उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने मृत्यू ( Old mans Death in hunger strike dhule ) आहे. तर वृद्ध आजींची देखील प्रकृती चिंताजनक आहे.
उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू -
सुदन्वा भदाने (वय 71) व त्यांच्या धर्मपत्नी रंजना भदाणे (वय 65) हे वृद्ध दाम्पत्य गेल्या 14 तारखेपासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आपल्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याचे उपोषण सुरू होते. तीन दिवसांच्या उपोषणानंतर या दोघेही वृद्ध दाम्पत्याची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वृद्ध आजोबांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी उपोषणादरम्यान प्रशासनातर्फे वृद्ध दाम्पत्याकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केलीव आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
मुलीला न्याय मिळण्यासाठी वडीलाचे उपोषण -
जावायाने मुलीला घरातून बाहेर काढून दुसरे लग्न केले या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी दाम्पत्याचे उपोषण हे सुरू होते. यावेळी त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - China Eastern Airlines Aircraft Accident : चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले