धुळे - जिल्ह्यात रविवारी कोरोना बधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. यात धुळे जिल्हा रुग्णालयातील 53 पैकी 26 जणांचे तर शिरपूर येथील 41 पैकी 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील वाढती कोरोना बधितांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आज (रविवार) जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या संख्येत तब्बल 51 रुग्णांची भर पडली. एकाच दिवशी इतक्या जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत असताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, यावर जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला असून 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकीकडे मृत्यूदर वाढत असला तरी दुसरीकडे मात्र रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. यावर जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालय धुळे येथील ५३ अहवालांपैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यातील रुग्णांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -
1. ४2 वर्ष/पु पुरमेपाडा
2. ४ अहवाल दसेरा मैदान धुळे
११ वर्ष / पु
४८ वर्ष / पु
१६ वर्ष / स्त्री
१७ वर्ष / पु
3. २० अहवाल मोगलाई धुळे
१७ वर्ष / पु
१६ वर्ष / पु
७३ वर्ष / स्त्री
८४ वर्ष / पु
९४ वर्ष / स्त्री
३७ वर्ष / स्त्री
१२ वर्ष / स्त्री
३१ वर्ष / पु
३० वर्ष / स्त्री
३५ वर्ष / पु
६ वर्ष / मुलगी
४ वर्ष / मुलगा
५५ वर्ष / स्त्री
२२ वर्ष / पु
२२ वर्ष / स्त्री
१५ वर्ष / मुलगा
४. १ अहवाल अभय कॉलेज जवळ
३५ वर्ष / पु
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ४१ अहवालांपैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये -
जि.प. शाळेजवळ १०
गुरुदत्त कॉलनी ३
सिद्धिविनायक कॉलनी ३
झेंडा चौक २
पाटील वाडा १
कुंभार टेक १
चौधरी गल्ली १
फुले चौक १
शिंपी गल्ली १
इतर २
शिरपूर शहरातील २ रुग्ण नाशिक येथे पॉझिटिव्ह आले आहेत
धुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५४८