ETV Bharat / state

धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात; जयकुमार रावल यांची डोकेदुखी वाढणार - धुळे

मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे चिरंजीव म्हणून नरेंद्र पाटील यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचा भावनिक मुद्दा उपस्थित करत जयकुमार रावल आणि भाजपला लक्ष्य करण्याची संधी नरेंद्र पाटील यांना मिळणार आहे.

धुळे: धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात; जयकुमार रावल यांची डोकेदुखी वाढणार
author img

By

Published : Oct 2, 2019, 2:34 AM IST

धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात रावल विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगणार आहे.

हे ही वाचा - भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच याच मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे चिरंजीव म्हणून नरेंद्र पाटील यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचा भावनिक मुद्दा उपस्थित करत जयकुमार रावल आणि भाजपला लक्ष्य करण्याची संधी नरेंद्र पाटील यांना मिळणार आहे. नरेंद्र पाटील यांची उमेदवारी जयकुमार रावल त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदखेड्यात रावल विरुद्ध पाटील सामना रंगणार आहे.

हे ही वाचा - पक्षांतर करणाऱ्या भामट्यांना मत नाही तर 'लाथा' मारा - बच्चू कडू

दरम्यान, धर्मा पाटलांच्या आत्महत्येच्या भावनिक मुद्द्यावरून मतदारांना साद घालण्यात नरेंद्र पाटील यशस्वी होतात का? आणि याचा फटका जयकुमार रावल यांना बसतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा - काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Intro:धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात रावल विरुद्ध पाटील असा राजकीय सामना रंगणार आहे. मात्र धर्मा पाटील यांच्या भावनिक मुद्द्यावरून मतदारांना साद घालण्यात नरेंद्र पाटील यशस्वी होतात का ?आणि याचा फटका जयकुमार रावल यांना बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Body:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे शिंदखेडा विधानसभा मतदार संघात भाजपकडून राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तसेच याच मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे चिरंजीव म्हणून नरेंद्र पाटील यांची ओळख आहे विधानसभा निवडणुकीत धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या कारणावरून भावनिक मुद्दा उपस्थित करत जयकुमार रावल आणि भाजपला लक्ष करण्याची संधी नरेंद्र पाटील यांना मिळणार आहे, नरेंद्र पाटील यांची उमेदवारी जयकुमार रावल त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदखेड्यात रावल विरुद्ध पाटील राजकीय सामना रंगणार आहे. धर्मा पाटील यांच्या भावनिक मुद्द्यावरून मतदारांना साद घालण्यात नरेंद्र पाटील यशस्वी होतात का ?आणि याचा फटका जयकुमार रावल यांना बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.