ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी नाभिक समाजाचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन

नाभिक समाज महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये, देशातील इतर राज्यांप्रमाणे नाभिक समाजाचा अनुसूचीत जाती प्रवर्गात समावेश करावा, त्यादृष्टीने त्यांना सर्व प्रकारचे लाभ आणि संरक्षण मिळावे, नाभिक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे आदींचा समावेश आहे.

विविध मागण्यांसाठी नाभिक समाजाचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन
author img

By

Published : Aug 14, 2019, 6:33 PM IST

धुळे - नाभिक समाज महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये, देशातील इतर राज्यांप्रमाणे नाभिक समाजाचा अनुसूचीत जाती प्रवर्गात समावेश करावा, त्यादृष्टीने त्यांना सर्व प्रकारचे लाभ आणि संरक्षण मिळावे, नाभिक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे आदींचा समावेश आहे.

विविध मागण्यांसाठी नाभिक समाजाचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन

याशिवाय, वीर शिवाजी काशीद, शूरवीर जिवाजी महाला यांचे स्मारक उभारून त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जावा, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाजारपेठ अशा ठिकाणी सलून व्यवसायासाठी राखीव जागा उपलब्ध करून द्यावी, नाभिक समाजासाठी ॲट्रॉसिटीचे नियम लागू करून संरक्षण द्यावे आदी मागण्यांचा देखील आंदेलकांनी केल्या आहेत. यावेळी उपस्थितांनी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांना मागण्यांबाबतचे निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी नाभिक समाज महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

Intro:नाभिक समाज महासंघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. देशातील इतर राज्याप्रमाणे नाभिक समाजाचा एससी प्रवर्गात समावेश करून सर्व प्रकारचे लाभ व संरक्षण मिळावे,नाभिक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे,यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
Body:देशातील इतर राज्याप्रमाणे नाभिक समाजाचा एससी प्रवर्गात समावेश करून सर्व प्रकारचे लाभ व संरक्षण मिळावे,नाभिक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे,वीर शिवाजी काशीद व शूरवीर जिवाजी महाला यांचे स्मारके उभारून पर्यटन स्थळ म्हणून सात सुधारणा करावी, रेल्वे स्टेशन बस,स्थानक बाजारपेठ अशा ठिकाणी सलून व्यवसाय साठी राखीव जागा उपलब्ध करून द्यावी शासकीय जागा, नाभिक समाज बांधवांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांना ॲट्रॉसिटी चे नियम लागू करून समाजाला संरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी नाभिक समाज महासंघाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. तसेच या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी डी गंगाथरन यांना निवेदन देण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नाभिक समाज महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.