धुळे - जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार डी. एस. अहिरे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त सूत्रांनी दिले आहे. याबाबत डी. एस. अहिरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांसोबत जाणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र असे असले तरी त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त अजून निश्चित झालेला नाही.
हेही वाचा - धुळ्यातील शिरपूर मतदारसंघात भाजप परिवर्तन घडवेल का?
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, विरोधी पक्षातील अनेक जणांचे भाजपात इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. खानदेशात देखील काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसणार आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार डी. एस. अहिरे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त सूत्रांनी दिले आहे. याबाबत ईटीव्हीने आमदार डी. एस. अहिरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला.
हेही वाचा - धुळ्याच्या राजकारणात अनिल गोटेंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
आपण कोणत्याही नाराजीतून हा निर्णय घेतला नसून साक्री विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न हे आजही प्रलंबित आहेत. या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांसोबत जाणार आहे. माजी मंत्री अमरीश पटेल यांनी जर भाजपात प्रवेश केला तर आपण देखील त्यांच्यासोबत जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया डी. एस. अहिरे यांनी दिली आहे. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशामुळे साक्री विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहेत.