ETV Bharat / state

Jan Akrosh Rally in Dhule : श्रीराम मूर्ती विटंबनेचा निषेधार्थ धुळ्यात भव्य जन आक्रोश मोर्चा, हजारोंचा जनसमुदाय, शहरात तणाव

शहरातील मोगलाई भागात श्रीराम मंदिरामध्ये घडलेल्या मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात शनिवारी भाजपासह हिंदुत्ववादी पक्ष संघटनांनी भव्य जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चातमध्ये धुळे शहरासह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.

Jan Akrosh Rally in Dhule
धुळ्यात जनआक्रोश मोर्चा
author img

By

Published : Jun 10, 2023, 12:20 PM IST

धुळे: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोगलाईतील श्रीराम मंदिराजवळ मोर्चाची सांगता होणार आहे.जन आक्रोशमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याने तणावाचे वातावरण आहे. याच मोर्चामध्ये श्रीराम मूर्तीची शोभायात्रा देखील काढली आहे. या मूर्तीची मोगलाई येथील श्रीराम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना होणार आहे. या ठिकाणी श्रीराम मूर्तीची विधिवत स्थापना केली जाईल.

मोर्चामध्ये धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सहभागी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला आहे. मोर्चा शांततेत पार पडावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शुक्रवारी मुस्लिम समाजाची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. तसेच मोर्चा आयोजकांनाही शांततेत मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. हा मोर्चा नसून श्रीराम मूर्तीची शोभायात्रा आहे, असे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मोर्चामध्ये अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे धुळे शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.

नेमके काय घडले होते: धुळे शहरात साखरी रोडवरील संमिश्र वस्ती असलेल्या मोगलाई भागांमध्ये श्रीराम मंदिर आहे या मंदिरामध्ये श्रीराम यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे सहा जून रोजी सकाळी निदर्शनाला आले त्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती याप्रकरणी पोलिसांनी भिलेश खेडकर या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन संशयतांना अटक केली.

राज्यात काही जिल्ह्यात तणावाची स्थिती:गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. कोल्हापूर, बीड, अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे स्टेट ठेवल्यावरून तणावाची स्थिती झाली होती. त्यामुळे पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील जनतेला शांततेचे आवाहन केले असून दंगली महाराष्ट्राला शोभणारे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यानंतर राज्यातील काही भागात तणावाची स्थिती कायम आहे.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.