धुळे - शहरातील इनरक्राफ्ट इंटेरियर ग्रुपने यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी यावर्षी गणेशोत्सवात जमा झालेला निधी सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात होते. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवाला मोठी परंपरा आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात अनेक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इनरक्राफ्ट इंटेरियर ग्रुपने यंदाचा गणेशोत्सव हा वायफळ खर्च न करता अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उत्सवासाठी जमा झालेला निधी सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तर उर्वरित निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे, अशी माहिती इनरक्राफ्ट इंटेरियर ग्रुपने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.