ETV Bharat / state

Shiv Sena Women Beaten Manager : महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील चाळे करणाऱ्या विमा कंपनीच्या मॅनेजरला भररस्त्यात चोपले

धुळे शहरातील रिलायन्स लाईफ इन्शुरन्सच्या सहायक शाखा व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याची गंभीर घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गेल्या अनेक दिवसांपासून व्यवस्थापकाकडून महिलेचा छळ होत होता. नितीन सोमनाथ पाटील असे, इन्शुरन्स कंपनीच्या सहायक शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे.

Shiv Sena Women Beaten Manager
Shiv Sena Women Beaten Manager
author img

By

Published : Jun 30, 2023, 7:39 PM IST

Updated : Jun 30, 2023, 7:48 PM IST

बँक मॅनेजरला शिवसेना महिलांनी दिला चोप

धुळे : शहरातील रिलायन्स लाईफ इन्शुरन्सच्या सहायक शाखा व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड केल्याचा गंभीर प्रकार गुरूवारी सकाळी समोर आला. गेल्या अनेक दिवसांपासून मॅनेजरकडून असहनीय छेडछाड होत असल्याने पीडित महिलेने अखेर शिवसेनेच्या (उबाठा) कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या रणरागिनींनी या मॅनेजरला चांगलाच चोप देत आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुझे प्यार हो गया : धुळे शहरात पारोळा रोडवरील गल्ली क्रमांक सहा येथील रिलायन्स लाईफ इन्शुरन्स या खासगी कंपननितीन सोमनाथ पाटील (३५, रा. निकुंभे ता. धुळे, ह. मु. हजारे कॉलनी, जीटीपी स्टॉपजवळ, देवपूर धुळे) हा असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. याच कंपनीत एक विवाहित महिलाही नोकरीवर आहे. गेल्या अनेक दिवसापासून तो या महिलेला त्रास देऊन अंगलट करण्याचा प्रयत्न करत होता. दिवसेंदिवस त्याची हिंमत वाढतच होती. त्यातच त्याने 'मुझे प्यार हो गया' असा मेसेज महिलेला पाठविला. यामुळे महिलेचा संयम सुटल्याने याबाबत थेट शिवसेनेच्या कार्यालयात तक्रार दिली.

कठोर कारवाई करण्याची मागणी : त्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी हेमा हेमाडे, शुभांगी पाटील यांनी शिवसैनिकांसोबत थेट कंपनीचे कार्यालय गाठले. त्यांनी असिस्टंट मॅनेजर नितीन पाटील याला कार्यालयातच चोप देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला ओढून आझादनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. आझादनगर पोलीस ठाण्यात पीआय प्रमोद पाटील यांच्याकडे शिवसेनेच्या रणरागिनींनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली .दरम्यान, या शाखा व्यवस्थापकाच्या वर्तवणुकीला वैतागून यापूर्वी काही महिलांनी काम सोडल्याचेही सांगण्यात येत आहे.

फिर्यादीनुसार गुन्हा दाखल : पीडितेने आझाद नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या सहाय्यक शाखा व्यवस्थापकाला ठाकरे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याने त्यांच्या या कारवाईचे धुळे शहरातील महिलांनी स्वागत केले आहे. महिलांचा त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या महिलांनी केला आहे.

आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले की, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नितीन पाटील यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ अ (१) (lV), ३५४ ड, ५०६, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उप निरीक्षक करनकाळ करीत आहेत. संशयित पोलिसांच्या ताब्यात असून, अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Last Updated : Jun 30, 2023, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.