ETV Bharat / state

तृणमुल गुंडांचा पक्ष, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा - डॉ. सुभाष भामरे - धुळे भाजपा बद्दल बातमी

तृणमुल गुंडांचा पक्ष असून सत्तेच्या मस्तीत आहे. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे.

imposes presidential rule in Bengal, demanded Dr. Subhash Bhamre
तृणमुल गुंडांचा पक्ष, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा - डॉ. सुभाष भामरे
author img

By

Published : May 5, 2021, 9:16 PM IST

धुळे - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा गुंडांचा पक्ष आहे. बंगालमध्ये भाजपाने मिळालेला जनादेश मान्य केला असला तरी तृणमूल मात्र सत्तेच्या मस्तीत आहे. भाजपा कार्यकर्त्यांवर खूनी हल्ले होत आहे. तेथे खूनी खेळ खेळला जात आहे. त्यामुळे बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे.

तृणमुल गुंडांचा पक्ष, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा - डॉ. सुभाष भामरे

बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा धुळे महानगर भाजपातर्फे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आजचे आंदोलन झाले. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या दंगलीत तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या चिथवणीने तृणमूल कार्यकर्ते आणि गुंडांनी केलेल्या हिसांचारात भाजपाच्या अनेक कार्यकत्यांना जीव गमवावा लागला. त्यांची घरे आणि मालमत्ता जाळण्यात आली. भाजपाच्या अशा कार्यकर्त्यांकडून आणि टीएमसीच्या गुंडांचा धिक्कार करण्यासाठी धुळ्यातील राजवाडे चौकात आंदोलन करण्यात आले. भारतीय लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या या कृत्याचे धनी असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आपल्या गुंडांना त्वरीत आळा घालावा अन्यथा तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देखील आंदोलक भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे. देशातील जनमानसात आणि भाजपमध्ये संतापाची भावना असून भाजपा कार्यकर्ते गुंडगिरीला न घाबरता अधिक जोमाने काम करतील असे खासदार डॉ. भामरे म्हणाले.

आंदोलनात होते सहभागी -

या आंदोलनात माजी आ. राजवर्धन कदमबांडे, महापौर चंद्रकांत सोनार, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष हिरामण गवळी, यशवंत यवलेकर, चंद्रकांत गुजराथी, ओमप्रकाश खंडेलवाल, विजय पाच्छापूरकर, अजय अग्रवाल, अमोल धामणे, नगरसेवक संजय पाटील, विनोद थोरात, बबन थोरात, सागर कोडगीर, शशी मोगलाईकर, अनिल सोनार आदी सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.