ETV Bharat / state

धुळे: बियरच्या खोक्यासह १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - धुळे

इंदोरकडून येणाऱ्या ट्रकमधून विनापरवाना बिअरचे खोक्यांची वाहतूक केली जात होती. यावेळी शिरपूर-शहादा रस्त्यावर गोल्ड रिफायनरीसमोर ट्रक अडवण्यात आला.

जप्त केलेली बिअर
author img

By

Published : Jun 20, 2019, 3:25 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर येथे अवैधरित्या बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील गोल्ड रिफायनरी समोर ही कारवाई करण्यात आली.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

इंदोरकडून येणाऱ्या ट्रकमधून विनापरवाना बिअरचे खोक्यांची वाहतूक केली जात होती. यावेळी शिरपूर-शहादा रस्त्यावर गोल्ड रिफायनरीसमोर ट्रक अडवण्यात आला. या ट्रकची तपासणी केली असता बिअरचे ५०० खोके तसेच बिअरच्या २४ कॅन आढळून आल्या. जवळपास १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहनचालकासह २ जणांना अटक करण्यात आली.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अवैधरित्या बिअर ची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह सुमारे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील गोल्ड रिफायनरी समोर ही कारवाई करण्यात आली.Body:धुळे जिल्हयातील शिरपूर येथील शिरपूर-शहादा रस्त्यावर गोल्ड रिफायनरीसमोर ट्रकमधून विनापरवाना बिअरचे खोके नेले जात असताना ट्रक अडवून पकडण्यात आला. एम.पी. ०९ जी.जी. ३०५५ क्रमांकाचा ट्रक इंदोर कडून येत होता. तो ट्रक महामार्गावरुन पुलाखालून शहादा रस्त्याकडून शहादा कडे जात होता. सदर ट्रक मध्ये विना परवाना बियर नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शहादा बायपासवर नाकाबंदी केली होती.
याठिकाणी ट्रक आल्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवला. ट्रक थांबवून ट्रक तपासला असता ट्रकमध्ये जवळपास ५०० बियरचे खोके आढळून आले. प्रत्येक खोक्यात २४ बियर कँन असा जवळपास एक हजार दोनशे बियर कॅन गाडीत आढळून आले.
या कारवाईत ट्रकसह जवळपास बारा ते पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणी गाडीच्या चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.