ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयातून विवाहितेची हत्या, फोन करून पतीनेच दिली माहिती - धुळे बातमी

संजय सुधाकर माळी पत्नी आणि मुलींसह गुजरातमध्ये दोन महिन्यांपासून ऊस तोडणीसाठी गेला होता. संजय हा पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण करत होता. दरम्यान अशाच भांडणातून त्याने पत्नीची हत्या केली.

dhule police station
dhule police station
author img

By

Published : Feb 1, 2020, 12:16 PM IST

धुळे- जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दारखेल येथील उसतोड मजुराने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कलाबाई माळी असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी संजय सुधाकर माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- 'सीएए संदर्भात बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही'

साक्री तालुक्यातील कासारे येथील संजय सुधाकर माळी याला एक मुलगा व दोन मुली आहेत. दोन महिन्यांपासून संजय पत्नी आणि मुलींसह गुजरात राज्यात ऊस तोडणीसाठी गेला होता. संजय हा चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला वारंवार मारहाण करत होता.

दरम्यान, संजयने कलाबाई यांच्या माहेरी फोन करून तिची हत्या केल्याचे सांगितले. त्यांचे नातेवाईक तत्काळ घटनास्थळी आले. त्यावेळी कलाबाई रक्ताच्या थोराळ्यात पडल्या होत्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी कलाबाई यांच्या आई लक्ष्मी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय माळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दारखेल येथील उसतोड मजुराने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत भल्या पहाटे पत्नीला मारहाण करित भिंतीवर डोके आपटून गळा दाबून हत्या केल्याची घटनेने खळबळ उडाली असून आरोपी संजय माळी याच्या विरोधात लक्ष्मी बाई शांताराम सोनवणे यांनी साक्री पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
        Body:धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे येथील संजय सुधाकर माळी यांच्या बरोबर सुमारे १० वर्षापुर्वी  कलाबाई हिशासोबत लग्न झाले असुन तिला एक मुलगा गोकुळ व दोन मुली दिपाली, रुपाली असे आहेत.माझी मुलगी कलाबाई संजय माळी व जावाई संजय सुधाकर माळी हे त्यांची मुलगी दिपाली व रुपाली यांच्यासह गुजरात राज्यात उसतोडणीसाठी सुमारे दोन महीन्यापासुन गेलेले होते. व त्यांचा मुलगा गोकुळ हा माझ्याकडे राहत होता. सुमारे १० ते १२ दिवसापुर्वी जावाई संजय सुधाकर माळी हा माझी मलगी कलाबाई हिचे चारित्र्यावर नेहमी संशय घेवन वेळोवेळी भांडण करत असतो व मारहाण देखील करत असतो तो कासारे गावी त्याची मुलगी दिपाली हिस घेवुन निघुन आला होता. त्याने कासारे गावात आल्यानंतर आम्हाला फोन करुन तुमची मुलगी पळुन गेली असे सांगीतले त्यावरुन आम्ही मुलगी कलाबाई यांचे मुकडदम गुलाब हिंम्मत माळी यास मुलगी बाबत विचारले असता त्यांनी सांगीतले की, तुमची मुलगी येथेच आहे.तुमचा जवाई संजय माळी याने तुमच्या मुलीवर संशय घेवुन तिस मारहाण करुन शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देवुन तो निघुन गेला आहे.तुमची मुलगी मी तुमच्या कडे पोहचवुन देतो.असे सांगीतले त्यानंतर लगेच दुस-या दिवशी मुकडदम गुलाब हिंम्मत माळी व पिंटु गंगाराम माळी असे मुलगी कलाबाई व नात रुपाली अशांना घेवुन दारखेल गावी आमच्या घरी पोहचवायला आले.त्यावेळेस त्यांनी सांगीतले की,तुमचा जावाई संजय सुधाकर
माळी हा तुमच्या मुलीस नेहमी पाप लावुन तिच्यावर संशय घेवुन तिस मारहाण करुन भांडण करत असतो.तो तिला सोडुन निघुन आला आहे.म्हणुन तुमची मुलगी आणि नात तुमच्याकडे पोहचविण्यास आलो आहोत. दि.२४/०१/२०२० रोजी जावाई संजय सुधाकर माळी हा आमचे कडे राहण्यास आला होता व त्यांनी मुलीची व आमची समजुत काढुन दारखेल येथे राहण्याचे सांगत असल्याने आम्ही त्यांना आमचे दारखेल गावात असलेल्या घरात राहण्याचे सांगीतले त्यानंतर जावाई व
मुलगी कलाबाई मुलांसह दारखेल येथे राहत होते.
  अश्पाक शेख शरिफोददीन खाटीक रा साक्री यांचे साक्री शिवारातील शेतात असतांना जावाई संजय सुधाकर माळी याने फोन करुन कळविले की, तुमची मुलगी कलाबाई हिस मी मारुन टाकलेले आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते करुन घ्या.असे सांगीतल्याने मी व माझे पती असे तात्काळ दारखेल ता.साक्री जि.धळे मुलगी कलाबाई राहत असलेल्या घरी जावुन पाहिले असता मुलगी घरात जमीनीवर पडलेली दिसली.आम्ही तिला आवाज दिला पंरत तिने कोणतेही उत्तर दिले नाही व तिची कोणतीही हालचाल होत नसल्याने आम्ही तिचे जवळ जावुन पाहीले असता तिच्या गळयावर वळ दिसत असल्याने आम्ही तात्काळ खाजगी वाहनातून मुलगी कलाबाई हिस टाकुन साक्री ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉ.कुंदन वाघ यांनी तपासून मयत घोषित केले. 
        संजय सुधाकर माळी याने चारीत्र्यावर संशयावरून दारखेल गांवी राहते घरात तिचा भिंतीवर डोके आपटुन गळा दाबून कलाबाई संजय माळी वय ३० वर्षे हिस जिवे ठार मारल्याने संजय सुधाकर माळी रा.कासारे याच्या विरोधात भा.द.वी कलम 302,323,504,506 प्रमाणे साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.