धुळे - शहरासह साक्री तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली आहे. साक्री गावासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला.
हेही वाचा - आता धावत्या लोकलमध्ये मिळणार मास्क; मध्य रेल्वेने मास्क विक्रीला दिली परवानगी
प्रामुख्याने पिंपळनेर परिसराला अवकाळी पाऊसाने झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसामुळे गहू पिकाला व फळबागांना जोरदार फटका बसला आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात या अवकाळी पावसाचा अजून मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यासह शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाचा इशारा यापूर्वीच दिला होता. आज धुळे जिल्ह्यातील अनेक भागात पाऊसाने शेतकऱ्यांच्या तारांबळ उडवली. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा - नागपुरात आता 31 मार्चपर्यंत संचारबंदी, पालकमंत्र्यांचे निर्देश