धुळे - येथील महामार्ग क्रमांक ६ वरील फागणे-कासविहिर शिवारात केमिकल घेऊन जाणार कंटेनर व ट्रॅव्हल्स बस यांची भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुकटी जवळील कासविहिर गावालगत महामार्ग क्रमांक ६ वर ट्रॅव्हल्स बस आणि केमिकल कंटेनरचा समोरासमोर अपघात झाला. यामुळे दोन्ही गाड्यांच्या भीषण स्फोट झाला. हा अपघात सोमवारी दुपारच्या सुमारास झाला. या अपघातानंतर आजूबाजूच्या २ किमी पर्यंतच्या परिसरापर्यन्त स्फोट झाल्याचा हादरा बसला. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिक भयभीत झाले.
या घटनेनंतर बऱ्याच उशीरापर्यंत यंत्रणा पोहोचू शकल्या नव्हत्या.