ETV Bharat / state

वनविभागातर्फे जमा करण्यात आलेला चारा शेतकऱ्यांना मोफत वाटप; दुष्काळात पशुपालकांना दिलासा - वनक्षेत्र

वनविभागाच्यावतीने जमा करण्यात आलेला चारा धुळे तालुक्यातील १४ गावातील पशुपालक शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात आला. यामुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

वनविभागातर्फे जमा करण्यात आलेला चारा शेतकऱ्यांना मोफत वितरण
author img

By

Published : Jun 25, 2019, 12:56 AM IST

धुळे - वनविभागाच्यावतीने जमा करण्यात आलेला चारा धुळे तालुक्यातील १४ गावातील पशुपालक शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात आला. यामुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून हा चारा वाटप करण्यात आला.

वनविभागातर्फे जमा करण्यात आलेला चारा शेतकऱ्यांना मोफत वितरण

दुष्काळामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. पाणी आणि चाराटंचाईला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांचे पालनपोषण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना चारा टंचाईपासून मुक्तता मिळावी, यासाठी वनविभागाच्यावतीने प्रशासनाकडे देण्यात आलेला चारा धुळे तालुक्यातील १४ गावातील शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आला.

धुळे तालुक्यातील वनक्षेत्रात ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८ च्या काळात १०० टन चाऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. हा चारा शेतकऱ्यांना मोफत देण्यात यावा, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार हा चारा शेतकऱ्यांना देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धुळे तालुक्यात पशुधनासाठी चारा कमी पडू दिला जाणार नाही. वेळ आली तर परजिल्ह्यातून चाऱ्याची मागणी केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Intro:वनविभागाच्या वतीने जमा करण्यात आलेला चारा धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात आला. धुळे तौक्यातील १४ गावातील पशुपालक शेतकऱ्यांना चारा देण्यात आला. यामुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून हा चारा वाटप करण्यात आला. Body:दुष्काळामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला असतांना पाणी आणि चाराटंचाईला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांचे पालनपोषण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना चारा टंचाईपासून मुक्तता मिळावी या साठी वनविभागाच्या वतीने प्रशासनाकडे देण्यात आलेला चारा धुळे तालुक्यातील १४ गावातील शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आला. धुळे तालुक्यातील वनक्षेत्रात ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८च्या काळात १०० टन चाऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. हा चारा शेतकऱ्यांना मोफत देण्यात यावा अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार हा चारा शेतकऱ्यांना देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धुळे तालुक्यात पशुधनासाठी चारा कमी पडू दिला जाणार नाही. वेळ आली तर परजिल्ह्यातून चाऱ्याची मागणी केली जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.