लातूर - नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयाची फसवणूक करणाऱ्या टोळीला अखेर अहमदपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींनी पुणे शहरात अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा आरोप आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
औसा तालुक्यातील याकतपूर येथील रहिवाशी दत्तात्रय श्रीपती लखने यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दत्तात्रय लखने हे २०१४-१५ मध्ये पुणे येथे कॉल सेंटरवर गाडी चालवण्याचे काम करत होते. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून या टोळीने त्यांच्याकडून १४ लाख रुपये घेतले आणि फरार झाले. दत्तात्रय यांनी मागील महिन्यात त्यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.
या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस आणि कोल्हापूर जिल्हयातील शहापूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून गुरुवारी ही कारवाई केली. या आरोपींना १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून या प्रकरणातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.