ETV Bharat / state

खोल विहिरीत पडलेल्या म्हशीची क्रेनद्वारे सुटका; धुळे येथील घटना

धुळे येथे शेतात पडलेल्या म्हशीला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात शेतकऱ्यांना यश आले. चाळीस फूट खोल विहिरीत पडल्यानंतरही म्हशीला दुखापत झालेली नाही.

खोल विहिरीत पडलेल्या म्हशीची क्रेनद्वारे सुटका; धुळे येथील घटना
author img

By

Published : Aug 20, 2019, 4:34 PM IST

धुळे - जिल्ह्यातील कापडणे येथे शेतात असलेल्या चाळीस फूट खोल विहिरीत म्हैस पडली होती. विहिरीत पडलेल्या म्हशीची सतर्क शेतकऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून सुटका केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे म्हशीचे प्राण वाचले आहे.

खोल विहिरीत पडलेल्या म्हशीची क्रेनद्वारे सुटका; धुळे येथील घटना
साहेबराव धुडकू माळी यांच्या मालकीची ही म्हैस आहे. गावात उन्हाळ्यापासून चारा टंचाई आहे. मागील आठ दिवसांत बर्‍यापैकी पाऊस झाल्याने गवताची वाढ होत आहे. गवताआड असलेली विहीर लक्षात न आल्याने चारा खात असलेली म्हैस विहिरीत पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.चाळीस फूट खोल विहिरीत पडल्यानंतरही म्हशीला दुखापत झाली नाही. त्यामुळे साहेबराव माळी यांनी समाधान व्यक्त केले.

Intro:

धुळे जिल्ह्यातील कापडणे येथे शेतशिवारात चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या म्हशीची सतर्क शेतकऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून सुटका केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे म्हशीचे प्राण वाचले आहे.
Body:
साहेबराव धुडकू माळी यांच्या मालकीची म्हैस आहे. उन्हाळ्यापासून चारा टंचाई आहे. गेल्या आठ दिवसांत बर्‍यापैकी पाऊस झाल्याने गवत चांगल तरारले आहे. दुष्काळामुळे पुरेश्या चार्‍यापासून वंचित असणारे गुरेढोरे सध्या हिरव्या गवतावर अधाशीपपणे चार्‍यावर तुटून पडत आहेत. गवताआड असलेली विहिर लक्षात न अाल्यानेच म्हैस कोसळल्याचे शेतकऱ्यांकडून समजत आहे.
चाळीस फुट खोल विहरीत पडल्यानंतरही म्हशीला दुखापत न झाल्याने माळी यांनी समाधान व्यक्त केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.