धुळे - शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिनेश अधिकार पाटील (रा. हिंगोणी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की शिरपूर तालुक्यातील हिंगोणी येथील बोरगाव रस्त्यालगत असलेल्या खळ्याची व गोठ्याच्या जागेच्या वादावरून संशयितांना एकत्रित गर्दी करून फिर्यादी व फिर्यादीचे वडील आपसात बोलाचाल करीत असतांना शिवीगाळ करीत हल्ला केला. यात फिर्यादीचे वडील सकाळी ७ ते ७:३०च्या सुमारास मरण पावले म्हणून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांचे घरासमोर येऊन फिर्यादीला व फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीचे वडिलांना संशयित शिवाजी विनायक पाटील याने लाकडी दांडक्याने, आरोपी गोकुळ विनायक पाटील याने हाताबुक्याने व निलेश ज्ञानेश्वर पाटील याने दगडाने मारून त्यांना उचलून खाली जमिनीवर आपटले त्यात त्यांचे डोक्याचे मागील बाजुस व बरगडी जवळ मार लागला तसेच फिर्यादीस संशयित लोटन विचार विक्रम पाटील याने हाताबुक्यांनी डाव्या डोळ्यावर मारले तसेच फिर्यादीचा चुलत भाऊ चतुर साहेबराव पाटील याचे उजव्या पायाच्या गुडघ्याखाली संशयित राहुल शिवाजी पाटील व गोकुळ विनायक पाटील यांनी लाथांनी मारहाण केल्याने मार लागला,
संशयितांविरूद्ध ३०२, १४३, १४७, ३२३, ५०४, पोलीस अधिनियमचे कलम ३६ (१) (३)चे उल्लंघन १३५ अन्वये साथरोग प्रतिबंधक कायदा १९९७ कलम ३ तसेच कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मयत अधिकार आत्माराम पाटील यांना ग्रामस्थांनी सकाळी उपजिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हिंगोणी येथील राहत्या घरून मयत अधिकार पाटील यांची अंतयात्रा काढण्यात आली. पोलीस अधिक तपास करीत आहे.