ETV Bharat / state

धुळ्यातील जवखेडा गावात छत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

author img

By

Published : Sep 8, 2019, 1:51 PM IST

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा गावात संततधार पावसामुळे घराचे छत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

कोसळलेले छत

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा गावात संततधार पावसामुळे घराचे छत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटे घडली आहे. गुलाब लोटन पाटील (वय 55 वर्षे), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - धुळ्यात तरूण शेतकऱ्याचा नाल्यात पडून मृत्यू

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथे घराचे छत कोसळल्याची घटना सकाळी सहाला उघडकीस आली. परिसरातील ग्रामस्थांनी ढिगारा सरकवून पाहिल्यावर गुलाब पाटील यांचा मृतदेह आढळला. पाटील यांच्या पत्नी कल्पनाबाई यांना मेंदूविकार असल्याने त्या मुलासोबत उपचारासाठी नाशिक येथे गेल्या होत्या. छत कोसळण्याचा झोपेत अंदाज न आल्याने पाटील यांचा बळी गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, असे परिवार आहे. शिरपूर तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू आहे, यामुळे ही घटना घडली आहे.

हेही वाचा - दोषींवर कठोर कारवाई करणार - पालकमंत्री भुसे​​​​​​​​​​​​​​

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा गावात संततधार पावसाने घराचे छत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. गुलाब लोटन पाटील (वय 55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Body:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथे घराचे छत कोसळल्याची घटना सकाळी सहाला लक्षात आली. परिसरातील ग्रामस्थांनी ढिगारा उपसून पाहिल्यावर गुलाब पाटील यांचा मृतदेह आढळला. पाटील यांच्या पत्नी कल्पनाबाई यांना मेंदूविकार असल्याने त्या मुलासोबत उपचारासाठी नाशिक येथे गेल्या होत्या. छत कोसळण्याचा झोपेत अंदाज न आल्याने पाटील यांचा बळी गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली असे कुटुंब आहे. शिरपूर तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू आहे, यामुळे ही घटना घडली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.