धुळे - धुळे जिल्ह्यातील चिंचवार गावाच्या शिवारात असलेल्या वन जमिनीवर बनावट मद्य निर्मितीचा सुरु असलेला कारखाना धुळे येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानं उद्ध्वस्त केला आहे. तसेच, ज्या शेतजमिनीवर हा कारखाना सुरु होता, त्याच्या मालकासह पाच जणांना अटक करून ४ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, दोन जण फरार आहेत. या बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे कनेक्शन धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर तालुक्यापर्यंत असल्याचं पोलिसांच्या प्रथमदर्शनी चौकशीत निष्पन्न झालं ( Fake liquor factory destroyed at Chinchwar dhule ) आहे.
धुळे जिल्ह्यातील चिंचवार गावाच्या शिवारात असलेल्या वन जमिनीवर ३० वर्षीय असलेला शेत मालक रफिक महेमूद पटेल यांच्या शेतातील घरात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानं छापा टाकला. त्या ठिकाणी बनावट मद्यनिर्मिती सुरु असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं. या बनावट मद्य निर्मितीसाठी लागणार साहित्य धुळे तालुक्यातील कावठी येथील गुलाब देविदास शिंदे, साक्री तालुक्यातील उभंड येथील पाटील नामक व्यक्ती ( पूर्ण नांव माहित नाही ) या दोघांचा हा मुद्देमाल असल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालंय. तर, बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारं साहित्य शिरपूर येथील दिनेश नावाच्या व्यक्तीने पुरवले असल्याची माहिती ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी या कारवाईत २ लाख रुपये किंमतीची टाटा सुमो, ७४ हजार ८८० रुपये किंमतीचे टँगो पंच देशी दारूचे २६ बॉक्स, १ लाख १२ हजार ३२० रुपये किंमतीचे रॉयल व्हिस्कीचे ५२ बॉक्स, ५० हजार रुपये किंमतीचे बुच पॅकिंग मशीन, दारू मिक्सिंग करता लागणारे मशीन, दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य, रिकाम्या बाटल्या, बुच, असा एकूण ४ लाख ६३ हजार २६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तसेच भादंवि कलम ३२८, ४२० नुसार सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Solapur Crime : सोळा महिन्यांच्या बाळावर लैंगिक अत्याचार आणि हत्या; माता, पित्याला फाशी