धुळे - सातवे वेतन अद्याप लागू न झाल्याने कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून धुळे शहरातील अधिष्ठाता कार्यालयाबाहेर आंदोलन केले. सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतु, राज्यातील चार कृषी विद्यापीठांना मात्र सातवा वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी आज काळ्या फिती लावून राज्य सरकारच्या विरोधात अधिष्ठाता कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
एक नोव्हेंबर पर्यंत राज्य शासनाचा निषेध करण्यात येणार असून यानंतरदेखील राज्य शासनाने दखल घेतली नाही, तर येत्या एक तारखेनंतर ते पाच तारखेपर्यंत लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे.
हेही वाचा- धुळ्यात 140 वर्षांची परंपरा जपत साध्या पद्धतीने रथोत्सव साजरा