ETV Bharat / state

धुळे महापालिकेतही कोरोनाचा शिरकाव, महापालिका चोवीस तासांसाठी बंद

author img

By

Published : Jul 23, 2020, 4:44 PM IST

धुळे महापालिकेतील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे महापालिकेचे कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले असून या कर्मचाऱ्याचा अहवाल प्राप्त होताच संपूर्ण महापालिकेच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

धुळे महापालिकेतही कोरोनाचा शिरकाव
धुळे महापालिकेतही कोरोनाचा शिरकाव

धुळे : धुळे महापालिकेतही कोरोनाने शिरकाव केला असून एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे, महापालिकेची इमारत 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली असून इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

धुळे महापालिकेतील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे महापालिकेचे कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले असून या कर्मचाऱ्याचा अहवाल प्राप्त होताच संपूर्ण महापालिकेच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच, नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेत येऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. धुळे शहरासह परिसरात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. यातच महापालिकेतील कर्मचाऱ्यालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांपासून विविध विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हा कर्मचारी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून विविध विभागात वावरणारा असल्याने त्याचा अनेक ठिकाणी संपर्क आला होता. त्यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेचे कामकाज बंद ठेवले. तर, मनपा आवारात फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच महापालिकेची इमारत पुढील चोवीस तासांसाठी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.