ETV Bharat / state

मंदिरात धूप, कापूर जाळतो, आमच्याकडे कोरोना होणार नाही; एकवीरा देवी मंदिराच्या विश्वस्तांचा अजब दावा - corona updates

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात धूप आणि कापूर नियमित जाळला जात असल्याने येथे कोरोना विषाणूचा कुठलाही प्रादुर्भाव वाढणार नाही, असा अजब दावा मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केला आहे.

एकवीरा देवी मंदिराची सुरक्षितता वाऱ्यावर

author img

By

Published : Mar 17, 2020, 4:21 PM IST

धुळे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर, दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आम्ही मंदिरात धूप आणि कापूर नियमित जाळतो, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, असा अजब दावा मंदिराच्या विश्वस्तांकडून केला जात आहे. तसेच, मंदिर प्रशासनाला ३१ मार्चपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे कुठलेही आदेश राज्य शासनाकडून अद्याप प्राप्त झालेले नाही, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

एकवीरा देवी मंदिराची सुरक्षितता वाऱ्यावर

करोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असून महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३९ जणांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व देवस्थाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरा प्रशासनाला अद्याप असे कुठलेही आदेश राज्य सरकारकडून प्राप्त झालेले नाहीत. तसेच, हे मंदिर भाविकांसाठी सध्या खुले असून भाविकांची नियमित दिसणारी गर्दी या ठिकाणी कायम आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असताना कुठलीही सुरक्षितता भाविकांसाठी करण्यात आलेली नाही.

हेही वाचा - धुळ्यातील शिरुर येथे एटीएम मशीन चोरणाऱ्या चोरट्याला अटक

खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवीचा यात्रोत्सव पुढील महिन्यात संपन्न होणार आहे. हा यात्रोत्सव स्थगित करण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही. मंदिर परिसरात धूप आणि कापूर नियमित जाळला जात असल्याने याठिकाणी कोरोना विषाणूचा कुठलाही प्रादुर्भाव वाढणार नाही असा अजब दावा मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केला आहे. त्यामुळे, येत्या काळात मंदिर प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा - शासकीय धान्य गोदामाला आग, जीवितहानी नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.