ETV Bharat / state

मद्यधुंद महिलेचा महामार्गावरच धिंगाणा.. पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, पाहा व्हिडिओ - मद्यधुंद महिलेचा महामार्गावरच धिंगाणा

नरडाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर मद्यपी महिलेने धिंगाणा घालत पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना रविवारी घडली. नरडाना पोलीस ठाण्यात त्या महिलेसह अन्य एका जणावर गुन्हा दाखल केला गेला आहे.

drunken woman beating the police
drunken woman beating the police
author img

By

Published : Mar 16, 2021, 7:40 PM IST

Updated : Mar 16, 2021, 8:04 PM IST

धुळे - नरडाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर मद्यपी महिलेने धिंगाणा घालत पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना रविवारी घडली. नरडाना पोलीस ठाण्यात त्या महिलेसह अन्य एका जणावर गुन्हा दाखल केला गेला आहे. नरडाणा टोलनाक्याजवळ रविवारी सायंकाळी भर रस्त्यात दारु पिऊन महिलेसह एका पुरुषाने धिंगाणा घातला. त्यांची विचारपूस करणाऱ्या पोलिसांचीच कॉलर पकडून शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली.

मद्यधुंद महिलेचा महामार्गावरच धिंगाणा..

हे ही वाचा - महाविकास आघाडीविरोधात भाजपचे सोशल वॉर! गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील जुने टोलनाक्यापासून जवळच हॉटेल शितलच्या पुढे अलका किशोर पाटील (४०, रा. डोंगरे महाराज नगर, पारोळा रोड, धुळे) आणि महादेव पेट्रोल पंपाचा मॅनेजर भूषण ज्ञानेश्वर पाटील (3१, रा. हतनूर ता. शिंदखेडा) हे दोघे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोंधळ घालत होते. त्यामुळे उपनिरीक्षक शरद पाटील आणि पोलीस कर्मचान्यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली. त्यावेळेस त्या महिलेसह पुरुषाने शिवीगाळ करीत रस्त्यावर धाव घेतली, पोलिसांनी रोखले असता थेट त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा - केवळ वाझे वाझेच सुरू आहे, गिरणी कामगारांकडे सुद्धा लक्ष द्या - आमदार पाटील

Last Updated : Mar 16, 2021, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.