ETV Bharat / state

धुळे ग्रामीण विधानसभा आढावा : कुणाल पाटील राखणार गड? - कुणाल पाटील

धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत विजयी झालेला उमेदवार परत विजयी होत नाही, असा इतिहास आहे, त्यामुळे कुणाल पाटील पुन्हा निवडून येतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कुणाल पाटील, हिलाल माळी आणि राम भदाणे
author img

By

Published : Sep 17, 2019, 9:11 PM IST

Updated : Sep 18, 2019, 11:48 PM IST

धुळे - संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाकडे देखील संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील हे विजयी झाले होते. यंदाही ते निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र, या मतदार संघात गेल्या निवडणुकीत विजयी झालेला उमेदवार परत विजयी होत नाही, असा इतिहास आहे, त्यामुळे ते पुन्हा निवडून येतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

धुळे ग्रामीण विधानसभा आढावा

हेही वाचा - संगमनेर विधानसभा आढावा: विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?

धुळे विधानसभा मतदार संघात अनेकजण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अनेकांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील हे 1 लाख 19 हजार 94 मतांनी विजयी झाले होते. पाटील यांनी भाजपच्या मनोहर भदाणे, शिवसेनेचे शरद पाटील आणि राष्ट्रवादीचे किरण पाटील यांचा पराभव केला होता. याही निवडणुकीत पाटील हे रिंगणात असतील हे निश्चित झाले आहे, मात्र ते काँग्रेसकडून निवडणूक लढवतील की अन्य कोणत्या पक्षाकडून हे निश्चित झालेले नाही. पाटील हे शिवसेनेत जातील, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपूर्वी उधाण आले होत. मात्र, त्याबाबत खात्रीशीर वृत्त अद्यापही समोर आलेले नाही.

हेही वाचा - आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?

गेल्या 5 वर्षात पाटील यांनी जलयुक्त शिवाराची केलेली कामे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेली रस्त्याची कामे, सिंचनाची पूर्ण केलेले प्रकल्प, यासोबत धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात झालेली अनेक विकास कामे पाहता या निवडणुकीत मतदार पाटील यांच्या बाजूने पुन्हा कौल देतात का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा - आढावा मतदारसंघाचा : अतिसंवेदनशील 'अहेरी मतदारसंघात' तिरंगी लढतीची शक्यता

या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून कोणाला संधी मिळते, हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे. शिवसेनकडून हिलाल माळी, भाजपकडून राम भदाणे, काँग्रेसकडून कुणाल पाटील हे इच्छुक असून या मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, यावर या मतदार संघाची पुढील गणिते ठरणार आहेत.

विधानसभा 2014 साली मिळालेली मते

  1. काँग्रेस - कुणाल पाटील - 1 लाख 19 हजार 94
  2. भाजप - मनोहर भदाणे - 73 हजार 12
  3. राष्ट्रवादी - किरण पाटील - 17 हजार 682
  4. शिवसेना - प्रा. शरद पाटील - 15 हजार 93

Intro:धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक असून अनेकांनी त्यासाठी तयारी सुरु केली आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून गेल्या २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील हे विजयी झाले होते, यंदाच्या निवडणुकीत देखील कुणाल पाटील हे रिंगणात असणार आहेत. मात्र या मतदार संघात गेल्या निवडणुकीत विजयी झालेला उमेदवार परत विजयी होत नाही असा इतिहास आहे, मात्र या निवडणुकीत कुणाल पाटील यांना पुन्हा मतदारांचा कौल मिळतो का ? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. Body:संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाकडे देखील संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील हे विजयी झाले होते. एकीकडे मोदी लाट आणि संपूर्ण राज्यात भाजपाला मिळालेलं बहुमत पाहता धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदारानी काँग्रेसच्या बाजूने कौल देऊन भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. गेल्या २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील हे १ लाख १९ हजार ९४ मतांनी विजयी झाले होते. कुणाल पाटील यांनी भाजपच्या मनोहर भदाणे, शिवसेनेचे शरद पाटील, राष्ट्रवादीचे किरण पाटील यांचा पराभव केला होता. याही निवडणुकीत कुणाल पाटील हे रिंगणात असतील हे निश्चित झालं आहे, मात्र ते काँग्रेसकडून निवडणूक लढवतील कि अन्य कोणत्या पक्षाकडून हे निश्चित झालेलं नाही. इतरांप्रमाणे कुणाल पाटील हे शिवसेनेत जातील अश्या चर्चाना गेल्या काही दिवसांपूर्वी उधाण आलं होत. मात्र त्याबाबत खात्रीशीर वृत्त अद्यापही समोर आलेलं नाही. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रा शरद पाटील हे विजयी झाले होते, मात्र मतदारांच्या नाराजीचा फटका २०१४ साली शिवसेनेला बसला होता. गेल्या ५ वर्षात कुणाल पाटील यांनी जलयुक्त शिवाराची केलेली कामे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेली रस्त्याची कामे, सिंचनाची पूर्ण केलेले प्रकल्प, यासोबत धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात झालेली अनेक विकास कामे पाहता या निवडणुकीत मतदार कुणाल पाटील यांच्या बाजूने पुन्हा कौल देतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या मतदार संघात गेल्या निवडणुकीत विजयी झालेला उमेदवार परत विजयी होत नाही असा इतिहास आहे, शिवसेना भाजपची युती झाल्यास धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून कोणाला संधी मिळते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. शिवसेनकडून हिलाल माळी, भाजपकडून राम भदाणे, काँग्रेसकडून कुणाल पाटील हे इच्छुक असून या मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

२०१४ साली मिळालेली मते

१) काँग्रेस - कुणाल पाटील - १ लाख १९ हजार ९४

२) भाजप - मनोहर भदाणे - ७३ हजार १२

३) राष्ट्रवादी - किरण पाटील - १७ हजार ६८२

४) शिवसेना - प्रा शरद पाटील - १५ हजार ९३

Conclusion:
Last Updated : Sep 18, 2019, 11:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.