ETV Bharat / state

धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

धुळे शहरातील मानाचा समजल्या जाणाऱ्या खुनी गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.

धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन
author img

By

Published : Sep 12, 2019, 8:09 PM IST

धुळे - शहरातील मानाचा समजल्या जाणाऱ्या खुनी गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे. खुनी मशिदीजवळ गणपतीची पालखी आल्यावर मुस्लिम बांधवांच्या वतीने गणरायाचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

हेही वाचा... खैराताबादमध्ये तब्बल '६१ फुटी' गणेश मूर्तीचे विसर्जन; पाहा व्हिडिओ

खुनी गणपतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी...

धुळ्यातील खुनी गणपतीला ऐतिहासिक महत्व आहे. 1895 साली खांबोटे नावाच्या गुरुजींनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून धुळ्यात गणेशोत्सव सुरू केला होता. यावेळी गणेश उत्सवादरम्यान हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर ब्रिटिशांनी गोळीबार केला , या गोळीबारात हिंदु मुस्लिम बांधव ठार झाले होते. तेव्हापासून या गणपतीला आणि येथील मशिदीला खुनी हे नाव पडले., असा या गणपतीचा इतिहास सांगितला जातो. यामुळे गणेश विसर्जनावेळी खुनी गणपतीची मिरवणूक या मशिदीजवळ आल्यानंतर मुस्लीम बांधव मिरवणुकीचे स्वागत करतात. विशेष म्हणजे नमाज अदा करण्याच्या वेळी गणरायाची पालखी मशिदीजवळ आणली जाते. याठिकाणी पालखी आल्यावर मूर्ती जड होते अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही हा विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

हेही वाचा... शहादा येथे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन; मुस्लीम बांधवांनी केले गणेश विसर्जन

Intro:धुळे शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या खुनी गणपतीच भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं. खुनी मशिदीजवळ गणपतीची पालखी आल्यावर मुस्लिम बांधवांच्या वतीने गणरायाचं स्वागत करण्यात आलं.

Body:धुळे शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या खुनी गणपतीच भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं. धुळ्यातील खुनी गणपतीला ऐतिहासिक महत्व आहे, 1895 साली खांबोटे नावाच्या गुरुजींनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून धुळ्यात गणेशोत्सव सुरू केला होता. यावेळी गणेशउत्सवादरम्यान हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये वाद झाला होता, यावेळी ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला होता, या गोळीबारात हिंदू मुस्लिम बांधव ठार झाले होते, यामुळे या गणपतीला आणि येथील मशिदीला खुनी हे नाव पडले, असा इतिहास सांगितला जातो, यामुळे गणेश विसर्जनावेळी खुनी गणपतीची मिरवणूक खुनी मशिदीजवळ आल्यावर या मिरवणुकीच स्वागत केलं जातं, विशेष म्हणजे नमाज अदा करण्याच्या वेळी गणरायाची पालखी मशिदीजवळ आणली जाते, याठिकाणी पालखी आल्यावर मूर्ती जड होते अशी भाविकांची श्रद्धा आहे, सालाबादप्रमाणे यंदाही हा विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.