धुळे - बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात पुकारलेल्या भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ वगळता मुस्लीम बहुल भागात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहे. तर मुस्लिमबहुल भागातील व्यापाऱ्यांनी तसेच व्यवसायिकांनी कडकडीत बंद पाळला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे या बंदला हिंसक वळण लागले असून याठिकाणी कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तर अन्य ठिकाणी मात्र शांततेत बंद पाळण्यात येत आहे.