ETV Bharat / state

अनिल गोटे आणि शरद पवार यांच्या भेटीमागील कारण गुलदस्त्यात - loksabha 2019

येत्या निवडणुकीत डॉ. भामरेंचा पराभव करण्यासाठी आमदार गोटेंनी ही भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. सोबतच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने गोटेंना साथ द्यावी, यासाठी भेट असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

शरद पवार आणि अनिल गोटे
author img

By

Published : Mar 21, 2019, 9:02 PM IST

धुळे - शहराचे आमदार अनिल गोटे यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. येत्या निवडणुकीत डॉ. भामरेंचा पराभव करण्यासाठी आमदार गोटेंनी ही भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. सोबतच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने गोटेंना साथ द्यावी, यासाठी भेट असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. तेलगी प्रकरणापासून अनिल गोटे आणि शरद पवार यांचे संबंध बिघडले होते. मात्र, अचानक गोटेंनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी अनिल गोटे हे देखील तयारी करीत आहेत. भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले आहे. यापार्श्वभूमीवर गोटेंनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचेही बोलले जात आहे. या भेटीमागील नेमके कारण अद्याप समजलेले नसले, तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीत नेमके काय घडले याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत अनिल गोटे हे डॉ. सुभाष भामरेंचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना अंतर्गत साथ देतात की, आणखी वेगळा मार्ग अवलंबतात हे देखील बघणे महत्वाचे असणार आहे.

Intro:धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या संबंधात वितुष्ट आलं होत. आमदार गोटे आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत डॉ भामरेंचा पराभव करण्यासाठी आमदार गोटेंनी हि भेट घेतल्याचं बोललं जात आहे, मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने गोटेंना साथ द्यावी यासाठी हि भेट असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.
Body:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. तेलगी प्रकरणापासून अनिल गोटे आणि शरद पवार यांचे संबंध बिघडले होते. मात्र अचानक गोटेंनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी अनिल गोटे हे देखील तयारी करीत आहेत, भाजपचे डॉ सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी आपण हि निवडणूक लढविणार असल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिली होती, यापार्श्वभूमीवर डॉ भामरेंचा पराभव करण्यासाठी याबाबत चर्चा करण्यासाठी गोटेंनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. या भेटीमागील नेमकं कारण अदयाप समजलेलं नसलं तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीत नेमकं काय घडलं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत अनिल गोटे हे डॉ सुभाष भामरेंचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना अंतर्गत साथ देतात कि अजून कोणता वेगळा मार्ग अवलंबवतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.