धुळे - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. यासाठी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पनात घट झाली आहे.
हेही वाचा - 'आरसीईपी हा पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेला दिलेला तिसरा मोठा धक्का ठरणार'
वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हणून दिवाळीचा सण ओळखला जातो. दिवाळीसाठी सासरी गेलेल्या मुली आपल्या माहेरी येतात आणि दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. यात आकाशकंदील, रांगोळ्या आकर्षक विद्युत रोषणाईचा समावेश आहे. तसेच विविध प्रकारचे आकाश कंदील बाजारात उपलब्ध झाले आहेत. नागरिकांकडून चायना कंपनीच्या आकाशकंदीलांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तर मातीच्या पणत्यांऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक पणत्यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
हेही वाचा - परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग; तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान
रविवारी साजरा होणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या सणासाठी लागणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्ती देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. जीएसटीचा परिणाम म्हणून यंदा मूर्तींचे भाव 8 ते 10 टक्क्यांनी वाढले आहेत. झेंडूच्या फुलांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे 20 ते 30 रुपये किलो दराने फुलांची विक्री होत आहे. यासोबत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणाऱ्या खरेदी खतांच्या वह्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. लहान मुलांना फटाके फोडण्यासाठी लागणाऱ्या बंदुका देखील बाजारात दाखल झाल्या आहेत. मात्र, यंदा परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दरवर्षी मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद यंदा मात्र घटल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे.