धुळे - शहरातील देवपूर भागात पांझरा नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
धुळे शहरातील पांझरा नदीपात्रात एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जखमा असून ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र, या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनीदेखील गर्दी केली होती. यावेळी उपमहापौर कल्याणी अपळकर यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. मृतदेहाची ओळख पटविण्याचा पोलीस प्रयत्न करीत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी, पावसामुळे काम संथगतीने